दिनांक:17/11/2024
लातूर : काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे. महाविकास आघाडीच्या जनसंपर्क अभियानांतर्गत शुक्रवारी शहरातील प्रभाग १, ८ व ९ मधील प्रचार रॅली ते बोलत होते. या रॅलीला मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी सांयकाळी ६ वाजता लातूर शहरातील प्रभाग ८ मधील शिवनेरी हॉटेल येथून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या - प्रचार रॅलचा प्रारंभ झाला. खोरी गल्ली, करमा बिग सिनेमा, विलासराव देशमुख पार्क, उस्मानपुरा, महात्मा बस्वेश्वर महाविद्यालय, खंडोबा गल्ली, औसा हनुमान, आझाद चौक, भोई गल्ली, कुरेशी मोहल्ला, दयाराम रोड, पतंगे निवास, खडक हनुमान, तेली गल्ली, पटेल चौक, हजरत सुरत शाहवली दर्गा, गणपती चौक, माळीगल्ली आणि पटेल आ. अमित देशमुखांचे विरोधकांना सडेतोड उत्तर
शहरातील जुन्या गावभागाचा नव्याने विकास आराखडा
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रचार रॅलीत प्रभाग १, ८ आणि ९ मध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. गावभागातही मोठ्या उत्साहाने माजी देशमुख यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना माजी आ. देशमुख यांनी गावभागाचा नव्याने विकास आराखडा तयारकरुन गावभागाचा सर्वांगीण विकास केला जाणार असल्याचे व गावभागात विलासराव देशमुख माता-बालक रुग्णालयाची उभारणी होत असल्याने या भागात वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीच्या प्रारंभीच हजारोंच्या संख्येत नागरिक तिरंगी व महाविकास आघाडीचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस पक्षाच्या
विजयाच्या घोषणांनी परीसर दुमदूमून गेला. रॅली मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी रांगोळी काढून मार्ग सुशोभित केला होता. अनेक घरांच्या छतावरुन रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली, हातात फलक, झेंडे घेऊन मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक सहभागी झाले होते. रॅली दरम्यान लोकनेते विलासराव देशमुख पार्क येथील श्री महादेव वैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर महात्मा बसवेश्वर कॉलेज समोरील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी किरण जाधव, दीपक सूळ, अमर जाधव, अहमदी बेगम, सुनील पडिले, अॅड. उदय गवारे, अशोक गोविंदपूरकर, एकनाथ पाटील, अमर राजपूत, सपना किसवे, कुणाल वागज, चांदपाशा इनामदार, समद पटेल, मोईज शेख, फारुक शेख, शिवकन्या पिंपळे, सत्तार शेख, अजय यादव, इसरार सगरे, फैसलखान कायमखानी, इमरान सय्यद, व्यंकटेश पुरी, सुपर्ण जगताप, अॅड़ गोपाळ बुरबुरे, विष्णु धायगुडे, रमाकांत गडदे, अभिषेक पतंगे, गौस शेख, इनायत सय्यद, राम स्वामी, गीता गौड, रईस टाके, अतिक बासले, अभिषेक किसवे, योगेश स्वामी, राहुल रोडे, पदाधिकारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments