Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा उमेदवार डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा महिला उद्योजकांशी संवाद*

दिनांक:17/11/2024
लातूर: लातूर शहर मतदार संघातील
भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी महिला उद्योजकांशी संवाद साधला. त्यांच्या विविध अडचणी जाणून घेत समस्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांना आश्वस्त केले. या संवाद बैठकीस माजी नगरसेविका शोभाताई पाटील, भाजपा महिला मोचांच्या अध्यक्षा रागिनीताई यादव, रश्मी जाधव, मेघा अग्रोया, मीनाताई गायकवाड, स्वातीताई घोरपडे, श्वेता लोंढे, वर्षाताई कुलकर्णी उपस्थित होत्या.
प्रदेश प्रवक्त्या नेहा बग्गा म्हणाल्या की, भाजपाची सत्ता आल्यापासून लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण, बचत गट, आत्मनिर्भरता अशा योजना व उपक्रम राबविले जात आहेत. महिलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३३ टक्के आरक्षण दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत देशाचे संविधान
बदलले जाणार नाही. प्रत्येक महिलेने घरोवर जाऊन सर्वांना कमळाला मतदान करण्यास सांगावे. एक-एक मत महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले, लातूर शहर विधानसभा मतदार संघातील उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उमेदवार या
नात्याने बोलताना डॉ. अर्चनाताई म्हण की, या निवडणुकीच्या माध्यमातून पर्व, नवा इतिहास घडत आहे. आपण सर्वांनी हातात हात घालून एकत्र कामा करावे. मी निवडून आल्यानंतर महिला तक्रार कक्ष, हेल्पलाईन चालू करून एक ग्रुप तयार केला जाईल. स्वाची तुम्हा सर्वांना मदत होईल. प्रत्येकाला आपल्या मनातल बोलण्यासाठी एक हक्काची जागा पाहिजे ती जागा आपण असल्याचे ताईनी बोलून दाखवले. या बैठकीस शहरातील महिल उद्योजकांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments