दिनांक:31/07/2025
लातूर (प्रतिनिधी); लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची (तडीपार) कारवाई करण्यात येत असून पोलीस ठाणे कासार शिरशी हद्दीतील इसम *नरेंद्र मनोहर बिरादार, राहणार देवी हल्लाळी, तालुका निलंगा जिल्हा लातूर.* असे आहे.
त्यांच्यावर सन 2023 कालावधीमध्ये दंगा धोपे व मारामारी करण्याचे गुन्हे दाखल असून लोकांससोबत किरकोळ कारणावरुन हाणामारी करुन दहशत निर्माण करणे, गावामध्ये गुंडगिरी व दादागिरी करण्याच्या सवयीच्या असून त्याचे वर्तनामुळे आगामी काळात राज्यात जिल्हायात शहरात जयंती, उत्सव, सण, निवडणुका मध्ये विघ्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नरेंद्र मनोहर बिरादार रा. देवीहल्लाळी ता. निलंगा यांना लातूर व धाराशिव या दोन जिल्हायातुन सहा महिन्याकरिता हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे .
यासंदर्भात पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कासार शिरशी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांनी नमूद आरोपी विरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी, निलंगा श्री. शरद झाडके यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या हद्दपारिच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यासंदर्भात आदेशित केले होते. त्यावरून अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी, निलंगा, डॉ. नितीन कटेकर गोसावी यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे कासार शिरशी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांनी नमूद आरोपी विरुद्ध सविस्तर हद्दपारचा प्रस्तावाचा पाठपुरावा करून उपविभागीय दंडाधिकारी निलंगा यांचे कार्यालयात सुनावणीअंति नमूद आरोपीस मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56(1)अन्वये सहा महिन्यासाठी लातूर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे.
आगामी काळात साजरे होणारे सण-उत्सव व येणारे काळात होऊ घातलेल्या निवडणुकांचे अनुषंगाने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1) प्रमाणे कार्यवाही करून सदर सराईत गुन्हेगाराला लातूर, धाराशिव जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
0 Comments