Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला 07 लाख 60 हजार रुपयाच्या सोन्याचे दागिने व वाहनासह अटक. 03 गुन्हे उघड. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*

दिनांक:18/08/2025

लातूर (प्रतिनिधी) : काही दिवसा पासून जिल्ह्यात  रात्रीच्या वेळी घराचे कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यावरून विविध


पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपीता विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात होते.

              पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथके तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता.

             सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना सदरच्या पथकाला रात्रीच्या वेळी कडीकोंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी पथकाने लातूर मधील छत्रपती चौक, औसा रोड परिसरातून एकाला चार चाकी वाहनासह ताब्यात घेतल. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांने त्यांचे नाव 


1) अविनाश दिलीप भोसले, वय 24 वर्ष राहणार पाटोदा, जिल्हा धाराशिव.


               असे असल्याचे सांगितले. त्याच्या शिफ्ट कंपनीच्या कारमधून 

त्याने व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी घराचे कडीकोंडे तोडून घरामधील सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याचे कबूल करून त्याने त्याच्या इतर साथीदारासह चोरी करून त्याचे हिश्याला आलेले 40 ग्रॅम सोन्याचे दागिने नमूद आरोपीकडून हस्तगत करण्यात आले असून चोरीच्या गुन्ह्यातून मिळालेल्या पैशाने खरेदी केलेली एक चार चाकी व दुचाकी वाहन सुद्धा हस्तगत करण्यात आली असून नमूद आरोपीने त्याच्या इतर साथीदारसह मिळून केलेले चोरीच्या पोलीस ठाणे भादा ,निलंगा,कासार शिरशी येथील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे. नमूद गुन्हेगार हा धाराशिव जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे. त्याच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्याच्या सोबतच्या साथीदारांचा शोध पोलिस पथक घेत आहे.

                आरोपीने चोरलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता भादा पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.

                   सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील 

सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, अमितकुमार पुणेकर, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अमलदार माधव बिलापट्टे, रामलिंग शिंदे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, तुराब पठाण, राजेश कंचे, गणेश साठे, सुहास जाधव, धनंजय गुट्टे, गोरोबा इंगोले, प्रज्वल कलमे, श्रीनिवास जांभळे केली आहे.

Post a Comment

0 Comments