दिनांक:16/08/2025
लातूर (प्रतिनिधी) : लातूर पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात अवैध धंद्यावर कठोर कारवाई साठी मोहीम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना दिनांक 14 ते 15 ऑगस्ट च्या मध्यरात्री रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ गुटखा, तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी दोन इसम त्यांच्या वाहनांमध्ये अवैध विक्रीसाठी वाहतूक व साठवणूक करत असल्याची माहिती मिळाली.
सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे मार्गदर्शनात सदरचे पथक दिनांक 15/08/2025 रोजी मध्यरात्री लातूर शहरातील पीव्हीआर चौक जवळील बजाज शोरूम च्या पाठीमागील रोडवर सापळा लावून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला 02 लाख 43 हजार 430 रुपयांच्या प्रतिबंधित गुटखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेली रेनॉल्ट कंपनीची चार चाकी वाहन क्रमांक एम.एच. 24 बी.एल. 2180 व दोन मोबाईल असा एकूण 11 लाख 38 हजार 430 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रतिबंधित गुटख्याची अवैधरित्या विक्री, वाहतूक, साठवणूक करताना मिळून आलेले इसम नामे
1)भीमाशंकर उर्फ गुड्डू सतीश गोडबोले, वय 29 वर्ष, राहणार मोती नगर, लातूर.
2) प्रज्वल उर्फ साई मल्लिनाथ थोरात , वय 25 वर्ष राहणार गल्ली, नंबर 06, वाल्मिकी नगर लातूर.
याचे विरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सफौ सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, मनोज खोसे, राजेश कंचे,दीनानाथ देवकते,प्रदीप चोपणे, शैलेश सुडे, केली आहे.
0 Comments