Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

विविध पक्षातील नेते,संघटना, कार्यकर्त्यांच्या पाठिंबा......आ.अमित देशमुख


दिनांक,: ,10/11/2024
लातूर (प्रतिनिधी): लातूर शहर विधानसभा मतदार संघातील अनेक विविध संघटना, संस्था, राजकीय पक्ष, कार्यकर्त्यांचा पाठिंबा देत जोर धरत आहे.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची राजकीय ताकद वाढत आहे त्यांची बाजू दिवसेंदिवस भक्कम होत असून विजयाची वाटचाल चालू असल्याचे दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित भाजप नेते माजी नगरसेवक भारत साब दे गौ शेख एडवोकेट गणेश कांबळे, अभिराज निंबाळकर यांनी आपल्या असंख्य समर्थकासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 
संकल्प प्रतिष्ठान व विश्वकर्मा पांचाळ संघटनेने ही याच सभेत आमदार अमित देशमुख यांना जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी या सर्व कार्यकर्त्याचे नाना पटोले यांनी पक्षात स्वागत केले. 
माजी मंत्री आमदार अमित देशमुख काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक असून ते मराठवाडा भरून दौरा चालू ठेवला आहे. मराठवाड्यात त्यांच्यावर मोठी जबाबदारी काँग्रेस पक्षाने दिली असल्याने संध्याकाळच्या वेळेस मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उमेदवाराचे प्रचार सभा घेऊन परत दिवसा आपल्याला लातूर मतदारसंघात प्रचार चालू आहे. या कामासाठी काँग्रेस पक्षाकडून माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांना स्वतंत्र हेलिकॉप्टर ची सुविधा देण्यात आली आहे. व पुढे भविष्यात माजी मंत्री अमित देशमुख यांना मोठी जबाबदारी देण्यात येईल असे नाना पटोले यांनी योगदान देतील असा विश्वास जानकर व्यक्त करत आहे.

Post a Comment

0 Comments