Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर कारवाई. 01 लाख 51 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त. 02 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल.

दिनांक:09/11/2024     
          अहमदपूर (प्रतिनिधी)अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत. 
         अवैध धंद्याची माहिती काढत असताना दिनांक  08/11/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, अहमदपूर येथे काही व्यक्ती लपून-छपून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी साठवणूक व वाहतूक करीत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने दिनांक 08/11/2024 रोजी पोलीस ठाणे अहमदपूर  हद्दीमधून घरामध्ये साठवणूक करण्यात आलेला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला 01 लाख 51 हजार 650 रूपयाचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केले आहे.
               प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या व्यवसायासाठी साठवणूक केल्याचे मिळून आलेले इसम नामे

1) शेख नवीन अब्दुलगणी, वय 25 वर्ष, राहणार दस्तगीर गल्ली अहमदपूर.

2)अन्वर सिकंदर सय्यद राहणार दस्तगीर गल्ली अहमदपूर.(फरार)

              यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे अहमदपूर चे पोलीस अधिकारी,अंमलदार करीत आहेत.
               सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अमलदार सचिन धारेकर , रामहरी भोसले, नाना भोंग, प्रदीप स्वामी, जमीर शेख यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments