Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

सर्व पक्षांचे कार्यकर्ते खांदाला खांदा लावून कामाला लागले...... आ.अमित विलासराव देशमुख


दिनांक:12/11/2024
लातूर शहर मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीच्यावतीने माजी मंत्री अमित देशमुख हे सलग चौथ्यांदा निवडणूक लढवित आहेत. मागील तीन निवडणुकांमध्ये त्यांना सुमारे ५० हजारांपेक्षा अधिकचे बहुमत मिळाले आहे. आता ते चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. मागील पाच वर्षांच्या काळात देशमुख यांना अडीच वर्षे महाविकास आघाडीच्यावतीने सत्तेत सहभागी होता आले. त्यांना अडीच वर्षे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली होती. ऐन कोरोना काळात त्यांनी केलेले काम
राज्यच नव्हे तर संपूर्ण देशभर कौतुकास्पद ठरले आहे. वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत महाराष्ट्राला आत्मनिर्भर बनविण्याचे काम त्यांच्या हातून झाले. या कामाची थेट जागतिक पातळीवरील यूनो या संघटनेने दखल घेतली होती. देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळात ऑक्सिजन प्लँटची उभारणी केली. स्वतंत्र महाविद्यालयाच्या इमारती उभारल्या, प्रवेश क्षमता वाढविली. वसतिगृहांची बांधणी केली. वैद्यकीय महाविद्यालयात विविध प्रकारची अत्याधुनिक उपकरणे आणली. यामुळे लातूरकरांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळू लागल्या. या विधानसभा निवडणुकीतही
अमित देशमुख यांना संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे. आमच्या मतदारसंघात एक तरी सभा द्या, अशी मागणी त्यांना होत आहे. यामुळे मागील दहा दिवसांपासून अमित देशमुख हे दररोज सकाळी सात वाजता बाभळगाव येथील हेलिपॅडवरून महाराष्ट्रभर दौरे करीत आहेत. मतदारसंघात सायंकाळनंतर कॉर्नर बैठका अथवा रॅली काढून आपला प्रचार करीत आहेत. देशमुख यांचे लातूर शहर मतदारसंघावर मागील पाच दशकांपासून वर्चस्व आहे. येथील प्रत्येकाशी त्यांची नाळ जुळलेली आहे. लातूर महानगरपालिकेतील माजी नगरसेवक, शिक्षण संस्थाचालक, शिक्षक संघटना, व्यापारी संघटना, कवील संघटना, मजूर संघटना, संस्था, संघटनांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यांच्या प्रचाराची संपूर्ण धुरा विविध विंगच्या पदाधिकारी सांभाळत आहेत.*

Post a Comment

0 Comments