उदगीर (प्रतिनिधी):महायुतीचे उमेदवार संजय बनसोडे यांनी गाव
भेटी दरम्यान, होनीहिप्परगा येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी उदगीर-जळकोट विधानसभेचे निरीक्षक हरीश कोटीवाले, राहुल केंद्रे, बसवराज पाटील कौळखेडकर, शिवशंकर धुप्पे, पंडित सुर्यवंशी, दिलीप गायकवाड, विकास जाधव, सतिश सुळे, हणमंत हंडरगुळे, रामदास बेंबडे, अमोल निडवदे, प्रा. श्याम डावळे, बाबासाहेब पाटील, सुनील केंद्रे, राजकुमार लिंबाळे, बुध्दकृपा गायकवाड, खंडु गायकवाड, राजाराम राठोड, दिलीप कांबळे, सुनिता नागरगोजे, सुमनबाई नागरगोजे, शोभा जाधव, तानाजी मुळे, नारायण नरवाडे, भीमराव जाधव, बबन नागरगोजे, भानुदास नागरगोजे, सुमनबाई केंद्रे, राजु केंद्रे, सचिन नागरगोजे, शिवाजी नागरगोजे, अरविंद नागरगोजे, राहुल बनसोडे, साधु लोणीकर, शरद पांचाळ, प्रसाद नाईकवाडे उपस्थित होते. यावेळी संजय बनसोडे पुढे बोलताना म्हणाले, आमदार झाल्यानंतर या मतदारसंघाचा
लोकसेवक म्हणूनच गेली पाच वर्ष काम केले आहे. मतदारसंघात सुमारे सहा हजार कोटी रुपयाचा विकास निधी आणला. तहसील, पंचायत समिती कार्यालयाची इमारत, प्रशासकीय इमारत, बौद्ध विहार, मराठा भवन, लिंगायत भवन, मुस्लीम शादीखाना, छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन, महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभिकरण व पुर्णाकृती पुतळे उभारणीसाठी निधी, छत्रपती शिवाजी महाराज महाप्रवेशव्दारासाठी निधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालयाची इमारत, पोलीस कर्मचारी निवासस्थान, महसूल कर्मचारी व अधिकारी यांचेसाठी इमारत, पोलीस ठाण्याची इमारत, उदगिरात भूमिगत गटार, पशुवैद्यकीय महाविद्यालय परिसरात विश्रामगृह, क्रीडांगणासाठी निधी, जळकोट येथे महावितरणचे कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय, तिरु नंदीवर बॅरेजेस, कोल्हापुरी बंधारे, जळकोट येथे विविध इमारती व भवन, महापुरुषांच्या पुतळ्यासाठी व चौकाच्या सुशोभिकरणासाठी निधी, रस्ते, पाणी, विद्युत सबस्टेशन, एम.आय.डी.सी. आदी कामे केली आहेत. पाच वर्षात मतदारसंघात विकासाची कामे करून चेहरा मोहरा बदललेला आहे. आता येणाऱ्या काळात उदगीरला जिल्हा करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांनी आशीर्वाद द्यावेत असे आवाहन बनसोडे यांनी केले. बनसोडे यांनी तोंडारपाटी, कर्लेवाडी, हणमंतवाडी, हंगरगा, क्षेत्रफाळ, नागोबाचीवाडी, जायबाचीवाडी, बामाजीचीवाडी आदीसह विविध गावात भेटी दिल्या. यावेळी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments