Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

कॉंग्रेस पक्षांनी विजयाचा शंख फुंकले...


दिनांक:31/10/2024
लातूर (प्रतिनिधी): लातूरमध्ये बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे दिनांक 29 रोजी झालेल्या विराट सभेला आमदार अमित देशमुख व धीरज देशमुख यांनी अर्ज भरल्यानंतर सभेत विजयाचा शंख फुकला यावेळी माजी क्रीडामंत्री दिलीपराव देशमुख यांनी महाविकास आघाडीची सार्थ स्वीकारली. 
काँग्रेसचे केंद्रीय नेते खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या प्रचंड शक्ती प्रदर्शनाने देशमुख यांच्या विजयावर शिक्कामृत केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
यावेळी माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी असंख्य भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने देशमुखांची ताकद निश्चित वाढली आहे व यासोबत आरपीआयचे एडवोकेट चिकटे, विद्रोही ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश केले. लोकसभा निवडणुकीत भाजपने माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप लक्षात घेता भाजपा पडल्याचे दिसते. सुधाकर शृंगारे यांच्या सुरात सूर मिसळत आमदार अमित देशमुख यांनी भाजपाकडून दलित बांधवांचा छळ केल्याचा आरोप केला आहे. खासदार इम्रान प्रतापगडी यांनी बोलताना स्वाभिमानी महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार दिल्लीच्या  रिमोटवर चालते ही बाब छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यासाठी छेदाची असल्याचे सांगत या निवडणुकीत विरोधकांनी जातीपातीच्या व धर्माच्या नावावर चालवलेला मत विभाजनाचा प्रयत्न हाणून पाडा असे आव्हान काँग्रेस नेते इम्रान प्रतापगडी यांनी यावेळी बोलले.

Post a Comment

0 Comments