Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

धनगर आरक्षण मार्गि लावणार.... माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर



दिनांक:31/10/2024
वलांडी: देवणी तालुक्यातील वलांडी येथील संगमेश्वर मंगल कार्यालयात निलंगा मतदारसंघातील धनगर समाजाचा मेळावा बुधवारी दिनांक 30 रोजी संपन्न झाला. यावेळी भाजपाचे प्रदेश सचिव युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दुर्वे विधानसभा प्रभारी दगडू सोळंके निलंग्याचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे देवणी तालुका अध्यक्ष काशिनाथ गरिबी देवबा काळे लक्ष्मण जागले अण्णाराव गोपाळे प्रकाश मित्रे प्रकाश कोटे तुकाराम काळे ब्रह्माजी भोसले विजयकुमार जागले नामदेव काळे नागेश तरंगे उपस्थित होते.
 महायुती सरकारनेच धनगर समाजाचा सन्मान केला आहे आरक्षणाचा प्रश्नही महायुती सरकारच निकाली काढले सरकार आल्यानंतर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ असा विश्वास आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे. 
आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पुढे म्हणाले मुघल सरकारने हिंदू संस्कृती मोडून काढली ती जतन करण्याचे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांनी केले आहे .स्वतंत्र्यानंतर साठ वर्षात काँग्रेसला त्यांचा सन्मान करता आला नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचा योग्य तो सन्मान केला राज्य सरकारनेही सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले अहमदनगरचे नाव बदलून ते अहिल्यानगर करण्यात आल्याचे आमदार निलंगेकर यांनी म्हणाली शरद पवारांनी मधुकर पिक्चर यांना हाताशी धरून धनगर व धनगर असा तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्याचा आरोप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments