दिनांक: 21/08/2025
जळकोट (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक दिनांक 14 ऑगस्ट 2024 अन्वये पंचायत समिती जळकोट येथील सहायक प्रशासन अधिकारी सचिन काडवादे यांची गुणवंत अधिकारी म्हणून शासना कडून निवड करण्यात आली असून त्याच्या पुरस्कार वितरण समारंभा आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजी नगर येथे माननीय विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर व माननीय श्री.राजेंद्र अहिरे, सहाय्यक आयुक्त (तपासणी) विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी त्यांच्या आई शांताबाई काडवादे पत्नी कांचन काडवादे मुलगा श्रवण काडवादे मुलगी सिद्धी
काडवादे भाऊ प्रकाश काडवादे हे पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित होते
0 Comments