Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

*दिनांक 18/08/2025* *"आपले लातूर सुरक्षीत लातूर" उपक्रम अंतर्गत गणेश मंडळांनी सीसीटीव्ही लावण्याचे लातूर पोलिसांचे आवाहन.*

दिनांक:21/08/2025

लातूर ( प्रतिनिधी): पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे संकल्पनेतून लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत  "आपले लातूर सुरक्षीत लातूर"  उपक्रम राबविण्यात येत आहे. 


               यामध्ये सुरक्षित लातूर साठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्या करिता विविध उपाय योजना करण्यात येणार आहेत. काही दिवसातच गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिशय उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. सदरचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा या करिता लातूर पोलिसांनी जय्यत तयारी केली  आहे. 

                   गणेशोत्सव काळात कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

          गणेश मंडळानी पेंडाल व परिसरामध्ये कमीत कमी 04 सीसीटीव्ही कॅमेरे  लावावे असे बंधन गणेश मंडळांना करण्यात येणार आहे, तसेच जे गणेश मंडळ 04 सीसीटीव्ही कॅमेरे लावतील त्या गणेश मंडळाचा संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सत्कार करुन प्रशस्तीपत्र देणार आहेत, जे गणेश मंडळ हे 08 सीसीटीव्ही कॅमेरे लावतील त्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी हे सत्कार करून प्रशस्तीपत्र देतील. तसेच जे गणेश मंडळ 16 सीसीटिव्ही कॅमेरे लावतील त्यांचा जिल्हा स्तरावर पोलीस अधीक्षक यांचे मार्फत सत्कार करुन प्रशस्तीपत्र देवुन गौरव करण्यात येणार आहे. 

                तसेच गणपती उत्सव संपल्यानंतर गणेश मंडळाने लावलेले कॅमेरे हे त्यांचे गावातील/चौकामध्ये महत्वाचे ठिकाणी कायमस्वरुपी लावण्यात जावेद, जेणे करुन लोकसहभागातुन सुरक्षीत लातूर ही संकल्पना यशस्वी होण्यास मदत होईल.

                 गणेश मंडळांनी सीसीटीव्ही बसवल्यास महिला आणि युवतींच्या सुरक्षेला मदत/ प्रोत्साहन मिळेल. गणेश मंडळांनी आपल्या वर्गणीचा सदुपयोग करून लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत,  गणेश मंडळांनी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, वेळेचे बंधन पाळावे, ध्वनिप्रदूषण टाळावे आणि पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments