Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस ठाणे गांधी चौक हद्दीतील चोरीच्या गुन्हयातील आरोपीला अटक. 03 गुन्हयांची उकल आरोपी कडून एकूण 01,45,700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.*

दिनांक:22/08/2025

    लातूर (प्रतिनिधी) : पोलीस ठाणे गांधीचौक लातूर येथे  दिनांक 20 ऑगस्ट रोजी पर्समधील रोख रक्कम 5700/- रु कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरल्याची घटना घडली होती.धाराशिव जिल्ह्यात राहणारी  महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध  पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुरनं 370/2025 कलम 303 (2) बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार नराळे यांचे कडे देण्यात आला होता.


                    सदर गुन्हयाचे तपासात पोलीस अधिक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधिक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनिल रेजितवाड यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक  करे पोलीस उप निरीक्षक गणेश चित्ते, म.पोउपनि श्रीमती पोवार,  सफौ/राजेंद्र टेकाळे, पोलीस अंमलदार राम गवारे, रविसन जाधव, संतोष गिरी, शिवराज भाडुळे, सचिन चंद्रपाटले, नागनाथ नराळे, कृष्णा शेळके, सतिष डोंगरे, ज्ञानेश्वर गायकवाड, महिला पोलीस अंमलदार नंदा स्वामी यांनी तांत्रीक पध्दतीने तपास करुन एका संशयीत महिला नामे

1) महेक ऊर्फ अदिबा अजीम शेख, वय 20 वर्ष रा. खाडगांव रोड लातूर. हिस ताब्यात घेवुन सदर महिलेला विश्वासात घेवुन विचारपुस केली असता सदर महिलेने गुन्हा केल्याचे कबुल करुन सदर गुन्हयातील गेला माल 5700/- रु रोख रक्कम हस्तगत केली.

                 तसेच सदर महिलेस आणखी विश्वासात घेवुन विचारपुस करता सदर महिलेने पो स्टे गांधी चौक गुरनं 279/2025 कलम 303 (2) बीएनएस गुन्हयातील गेला माल 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण व गुरनं 295/2025 कलम 303 (2) बीएनएस मधील गेला माल एक 05 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असे चोरी केल्याची कबुली दिल्याने तीनही गुन्हयात चोरीस गेलेला एकुण 01,45,700/- रु मुद्देमाल हस्तगत करुन तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

Post a Comment

0 Comments