दिनांक: 06/08/2025
लातूर (प्रतिनिधी) : दोन मित्रांमध्ये फोनवर बाचाबाची झाल्याने राग आलेल्या आरोपी मित्राच्या वडिलांनी विद्यार्थी असलेल्या मुलाच्या मित्राला बोलावून घेतले .व सुरुवातीला लातूर शहरात बेदम गंभीर मारहाण केली .त्यानंतर गाडीत घालून सारोळा रस्त्यावरील शेतात नेऊन सहा जणांनी लोखंडी रॉड ,स्टंपने लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी दिनांक 4 दीड वाजण्याच्या सुमारास लातूर येथील बस स्थानकाच्या बोळात व सारोळा शिवारातील एका शेतात घडली.
लातूरच्या कोल्हे नगर येथील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी आकाश बालाजी कुटवाडे वय 24 याचे मित्र यश विजय नरहरे यांच्या सोबत फोनवर भांडण झाले या दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली हे बोलणे यश यांचे वडील आरोपी विजय नरहरे यांनी ऐकले व त्यांनी तात्काळ त्याच्या मुलाला सोबत घेऊन लातूरचे बस स्थानक गाठले तेथे त्यांचा मित्र फिर्यादी आकाश कुटवाडे याला बोलावून घेतले बसतात बस स्थानका शेजारील एका लॉजच्या बोळात आकाश याला बेदम मारहाण केली. व त्यानंतर त्याला उचलून गाडीत घालण्यात आले सोमवारी मध्यरात्रीचे एक वाजले होते सारोळा रस्त्यावरील एका शेतात आकाश कुटवाडे याला नेहण्यात आले. तेथे मारहाण करण्यासाठी आरोपी यश विजय नरहरे, विजय नरहरे ,प्रसन्न नरहरे ,यांच्यासह अन्य तीन असे सहा आरोपी आले यश व विजय नरहरे यांनी आकाश याला लोखंडी रोड व स्टंपने बेदम मारहाण केली प्रसन्न नरहरी यांनीही बेदम मारहाण केली आणि अन्य अनोळखी तीन आरोपींनी आकाश याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.
याप्रकरणी लातूरच्या गांधी चौक पोलीस ठाण्यात आरोपी यश विजय नरहरे, विजय नरहरे,प्रसन्न नरहरे,यांच्या सह अन्य तीन अनोळखी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रितवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे हे करीत आहेत.
0 Comments