*दिनांक: 19/04/2025*
वाढवणा (प्रतिनिधी): लातूर पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. त्या अनुषंगाने पथक माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 17/04/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, पोलीस ठाणे वाढवणा तसेच औसा हद्दीतून चोरलेल्या ट्रॅक्टर हेड व ट्रॉली ची व ते चोरणाऱ्या आरोपीची खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनांक
17/04/2025 रोजी सदर पथक तात्काळ लातूर शहरातील छत्रपती चौकात जाऊन माहिती मधील आरोपी नामे
1) रामदास बाबुराव जाधव, वय 27 वर्ष, राहणार कांबळगा तालुका शिरूर अनंतपाळ, जिल्हा लातूर.
2) विठ्ठल लक्ष्मण शेळके, वय 19 वर्ष, राहणार समता नगर, उदगीर.
यांना ताब्यात घेऊन ट्रॅक्टर हेड व ट्रॅक्टर ट्रॉली बाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले कि, ते दोघे व त्यांच्यासोबत आणखीन एक साथीदार 3) योगेश राजेंद्र किरवले, राहणार येळी, तालुका औसा (फरार) असे मिळून फवारणी मशीन बसवलेले ट्रॅक्टर चे हेड पोलीस ठाणे वाढवणा येथून तर पोलीस ठाणे औसा येथून ट्रॅक्टर ट्रॉली चोरून तावरज खेडा जिल्हा धाराशिव येथे एका शेतकऱ्याच्या आखाड्यावर ठेवलेले आहे असे सांगितले तसेच त्यांच्याकडील बुलेट मोटरसायकल फरार आरोपी किरवले यांनी कोठून तरी चोरून आणल्याचे सांगितले. त्यावरून नमूद दोन आरोपीकडून त्यांनी चोरलेल्या ट्रॅक्टर हेड व ट्रॉली तसेच एक बुलेट मोटरसायकल ज्याची किंमत 05 लाख 45 हजार रुपये असा असून ते जप्त करण्यात आले आहे.
नमूद आरोपींना पोलीस ठाणे वाढवणा येथे पुढील कार्यवाहीस्तव ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, तुराब पठाण, राजेश कंचे, मोहन सुरवसे, नकुल पाटील यांनी पार पाडली.
0 Comments