Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला 02 लाख 80 रुपयाच्या 16 मोबाईलसह अटक. तीन गुन्हे उघड. स्थानिक गुन्हे शाखेची कारवा

दिनांक:18/04/2025

लातूर (प्रतिनिधी):लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दी मध्ये अज्ञात आरोपींनी घरातून दुकानातून  मोबाईल व चोरी केल्याची घटना घडल्या होत्या. 


              पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथक तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता सदर पथकाला त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना आल्या होत्या. 

             सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना बातमी दाराकडून मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा शोध घेण्यात येत होते.

                वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी केलेल्या परिश्रमामुळे पथकाला मोबाईल चोरीच्या गुन्हेगाराची माहिती मिळाली.

            नमूद चोरीतील गुन्हेगार त्याने चोरलेली मोबाईल विकण्यासाठी बाभळगाव चौक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. सदरचे पथक तात्काळ नमूद परिसरात सापळा लावून संशयित आरोपीला ताब्यात घेतले.

              सदर पथकांनी अतिशय कुशलतेने सापळा लावून मोबाईल चोरी गुन्ह्यातील संशयित आरोपीला दिनांक 16/04/2025 रोजी ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव 


1) महादेव दिलीप सन्मुखराव, वय 22 वर्ष, राहणार राजीव नगर, बाभळगाव रोड, लातूर. असे असल्याचे सांगितले त्याच्या हातामध्ये असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून चोरलेले एकूण 16 मोबाईल मिळून आले त्याने सदरचे मोबाईल विविध ठिकाणाहून चोरी केल्याचे मोबाईल कबूल केले असून मिळालेल्या मोबाईलची पाहणी केली असता पोलीस ठाणे गांधी चौक येथील दोन व शिवाजीनगर येथे एक गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

                त्यावरून नमूद आरोपीस त्याने चोरलेल्या 16 मोबाईल एकूण 02 लाख 80 हजार 499 रुपयाचा  मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे गांधी चौक यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

                   सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार तुळशीराम बरुरे,योगेश गायकवाड, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, गणेश साठे,  चालक पोलिस अमलदार, प्रदीप चोपणे,चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments