Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

लातूरची जनता विकास करणाऱ्यांच्या पाठीशी .आ. अमित देशमुख यांच्या प्रचार रॅलींना जंगी प्रतिसाद*

दिनांक:15/11/2024
लातूर (प्रतिनिधी): लातूर शहर विधानसभा
मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांची जनसंपर्क अभियाना अंतर्गत बुधवारी सांयकाळी शहरातील प्रभाग ९, १३, १४, व १५ मधून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या रॅलीला या चारही प्रभागांतील मतदारांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. पुरुष, महिला, युवती मोठ्या प्रमाणात या रॅलीत सहभागी झाले होते. महीलांची व युवकांची संख्या
लक्षणिय होती. प्रभाग क्रमांक १३
मध्ये संविधान चौक येथे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. तेथूनच प्रचार रॅलीस सुरुवात झाली. काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणांनी परीसर दुमदूमून गेला. रॅली मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी रांगोळी काढून मार्ग सुशोभित केला होता. अनेक घरांच्या छतावरुन रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. हातात फलक, झेडे घेऊन मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते नागरीक सहभागी झाले होते. विरोधी
क्षाने १५ दिवसांत उमेदवार
आयात केला. या निवडणुकीत लातूरकरांना गांभीर्याने विचार करायचा आहे. ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे. या निवडणुकीत तुमच्या आशीर्वादाने आपल्याला विजयाचा चौकार मारायचा आहे. प्रत्येकाने मतदान करावे, कोणीही मतदानापासून वंचित राहू नये. विरोधी पक्षाकडे उमेदवार नव्हता. त्यांनी हा लादलेला उमदेवार १५ दिवसांत आयात केला आहे, पण लातूरकर जनता सूज्ञ आहे. ते
विकास करणाऱ्यांच्या पाठीशी
खंबीरपणे उभे राहतील, श सांगताना आमदार अमित देशमुख यांनी येत्या २० तारखेला बहुमान विजयी करण्याचे मतदारांन आवाहन केले.
संवीधान चौकापासुन सुरुवात होवून खाडगाव रोड, हिप्परका कॉम्पलेक्स त्यानंतर प्रभाग क्रमांक १४ मध्ये गणेश चौकापासून सुरुवात झाली व महसुल कॉलनी, जुना औसा रोड, श्रीराम चौक, दादोजी कोंडदेव नगर, केदारनाव शाळेजवळून प्रभाग क्रमांक १५ मध्ये लगस्कर बिल्डींग पासू न सुरुवात झाली. पुढे देशमुख हॉस्पिटल, आदर्श कॉलनी कमान, कम्युनिटी हॉल, नारायण नगर, सिताराम चौक, अष्टविनायक मंदीर, शिवनगर, शिवनगर, ठाकरे चौक येथून प्रभाग क्रमांक ९ मधील मिनी मार्केट, कामदार रोड, बसवेश्वर कॉलेज, मनपा मागील बाजुने, विलासराव देशमुख पार्क, शिवनेरी गेट, येथे सदरील रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी पदाधिकारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments