Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कर्तव्यामुळे अपघात होण्याचे टळले ...

 दिनांक:13/06/2025

धाराशिव (प्रतिनिधी): धाराशिव येथील गोवर्धन वाडी महामार्गावरून रात्री, 10:30  वाजता घरी जात असताना वरुडा रोडवरील शिंदे कॉलेज जवळ रेल्वे कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल साचला आहे ही बाब खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निदर्शनास आली या ठिकाणी चिखलामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक वाहनाचे अपघात होत होते. एक बुलेरो गाडी खोलवर रुतून बसली होती.


 व एक  ऑटो रिक्षा व एक टु व्हीलर घसरून पडले होते. परिस्थिती गंभीर असल्याचे निदर्शनास येताच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्वरित स्वतःची गाडी जवळील प्लॉटवर नेली आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना यासंदर्भात जाब विचारला चिखल का स्वच्छ करण्यात आलेला नाही. अशी विचारणा करताच त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून सदर परिसरातील रस्त्याची दुर अवस्था निदर्शनास आणून दिले. यासोबतच त्यांनी पोलीस निरीक्षक आणि आरटीओ अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. व प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था दाखवली.

 या पाठपुराव्यामुळे संबंधित रेल्वे कंत्राट दाराला तात्काळ रस्ता स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले आणि काही वेळातच रस्ता साफ करून वाहतुकीस योग्य करण्यात आला यामुळे  रात्री होऊ शकणारी आणखीन अपघात टळले आणि नागरिकांना सुरक्षिततेची हमी मिळाली. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या तात्काळ कर्तव्यामुळे नागरिकाकडून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रशासनाच्या दृष्टीने हा एक जबाबदारीची जाणीव व्यक्तिमत्व मानला जात आहे.

Post a Comment

0 Comments