Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

चंदनाच्या झाडांची अवैध तोड करून चंदनाचे लाकडे,वाहनासह 03 लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त.. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई.*

दिनांक:04/06/2025

  लातूर( प्रतिनिधी): पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता विशेष पथकाची निर्मिती करून मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे सुचित केले  आहे. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांचे मार्गदर्शनात  दि.03/06/2024 रोजी विशेष पथकाला मिळालेल्या माहितीवरून औसा पोलीस ठाणे हद्दीतील इंदिरानगर परिसरामधील एका पत्राच्या शेडवर छापेमारी करण्यात आली. सदर शेडमध्ये प्रतिबंधित व संरक्षित चंदनाची साल काढून तसलेला चंदनाचा गाभा व लाकडाची चोरटी विक्री करण्यासाठी साठवून ठेवले चंदन बाळगलेले तीनजण मिळून आले.तर एक इसम पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला उर्वरित तीन इसमाना ताब्यात घेऊन त्याचे व पळून गेलेल्याचे नाव,पत्ता विचारता त्यांनी.



1) सुरेश बाबुराव जाधव, वय 40 वर्ष, राहणार निलंगा.


2) जनार्दन रावसाहेब पवार, वय 40 वर्ष, राहणार बुजरूकवाडी तालुका निलंगा.


3)सूर्यकांत जाधव वय 52 वर्ष राहणार बुजरूकवाडी तालुका निलंगा.


4) बालाजी विनायक व्होनताळे, राहणार इंदिरानगर औसा (फरार)


              असे  असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून 30 किलो चंदन,चार मोटरसायकली, एक वजन काटा असा एकूण 03 लाख 35 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


               विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांचे  फिर्यादीवरून पोलीस स्टेशन औसा येथे  कलम 41,42 भारतीय वन अधिनियम 1927 व 04 महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम, 303(2),3 (5) भारतीय न्याय संहिता प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

         सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या नेतृत्वातील पथकामधील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक  आयुब शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस अमलदार रामहरी भोसले, गुंडरे, चालक पोलीस अमलदार दीपक वैष्णव यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments