दिनांक:31/05/2025
भोकर( तालुका प्रतिनिधी) शहरातील गट क्रमांक 479 वार्ड क्रमांक 2 मधील मालमत्ता क्रमांक 27 86 जुना वार्ड क्रमांक 3 मधील जागेवर आपले क्षेत्रफळ सोडून नगरपरिषद व शासकीय नाल्याच्या जागेत बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आल्याप्रकरणी सदर बांधकाम पाडण्यात यावे या मागणीसाठी आदिवासी विकास संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकारी भोकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गट क्रमांक 479 मधील वार्ड क्रमांक 2 मालमत्ता क्रमांक 2786 जुना वार्ड क्रमांक 3 मध्ये दिगंबर शेषराव सूर्यवंशी व गोपीनाथ शेषराव सूर्यवंशी यांनी आपले क्षेत्रफळ सोडून जास्तीच्या जागेत पाठीमागे नाल्यावर कोणतीही परवानगी न घेता 3 फूट बांधकाम केले आहे शासनाची फसवणूक करून बेकायदेशीररित्या हे बांधकाम करण्यात येत आहे यापूर्वी तक्रार करूनही या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून अतिक्रम येथे झालेले बांधकाम पाडण्यात यावे अन्यथा 2025 पासून आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा आदिवासी संघटनेचे प्रदेश सचिव विजय मोरे, रवी गेंटेवार, गंगाधर नकलवाड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे
0 Comments