Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण चोरणाऱ्या महिलेला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. 1 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. दोन गुन्हे उघड*

दिनांक:27/06/2025

 मंगळसूत्र गंठण चोरणाऱ्या गुन्ह्यातील महिला आरोपीला अटक. 30.3 ग्राम सोन्याचे दागिने असा 1 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. 02 गुन्हे उघड. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.



         लातूर (प्रतिनिधी ) : लातूर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी/ अमलदारांचे पथक चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. सदर पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती.

               दरम्यान 24/06/2025 पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोरलेले सोन्याचे दागिने  विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका महिलेला गरुड चौक परिसरातून रोडवरून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्यांचे नाव


1) सीमा विनायक मस्के, वय 50 वर्ष, राहणार बालाजी नगर लातूर.

               असे असल्याचे सांगितले. नमूद महिलांना महिला पोलिसाच्या मदतीने ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने मागील काही महिन्यापासून लातूर शहरातील गांधी चौक येथील मध्यवर्ती बस स्थानक, व  अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बस स्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेऊन, बस मधून चढ-उतार करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण चोरून निघून जाण्याचे गुन्हे केल्याचे कबूल केले.

             त्यावरून लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे अभिलेखाची माहिती घेतली असता पोलीस ठाणे गांधीचौक व अहमदपूर येथील प्रत्येकी 1 गुन्हा असे दोन गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले आहेत.

          

             नमूद आरोपींनी वर गुन्ह्यात चोरलेला सोन्याचे 30.3 ग्रॅम वजनाचे  मंगळसूत्रे, गंठण एकूण 01,58,000 /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस ठाणे गांधी चौक हे करीत आहेत.

                सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस उप-निरीक्षक संजय भोसले,पोलीस अमलदार संजय कांबळे, योगेश गायकवाड, सूर्यकांत कलमे, राजेश कांचे  तुळशीराम बरुरे, विनोद चलवाड, महिला पोलीस अमलदार प्रगती राजपूत, अलका बोमुटवाड, चालक पोलीस अमलदार चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments