पदयात्रेदरम्यान विविध ठिकाणी प्रभागातील महिलांनी महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे औक्षण करून निवडणुकीत विजयासाठी आशीर्वाद दिला. तब्बल तीन तास चाललेल्या या
पदयात्रेचे प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. कामाची वेळ असूनही पदयात्रेत महिला भगिनींची मोठी उपस्थिती होती. यावेळी नागरिकांनी आपल्या भागातील समस्या ताईंच्या कानावर घालत त्या सोडविण्यासाठी विद्यमान नेतृत्वाने प्रयत्न न केल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधी अथवा उमेदवारही आमच्या भागाकडे येत नाहीत. या भागात येणाऱ्या आपण पहिल्याच लोकप्रतिनिधी असल्याच्या भावनाही नागरिकांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या.
महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व आशीर्वाद घेऊन पदयात्रेस प्रारंभ झाला.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, महात्मा बसवेश्वर मंडलाध्यक्ष संजय गीर, माजी नगरसेविका रागिनीताई यादव, भाग्यश्री शेळके, मीनाताई भोसले, मीनाताई गायकवाड, आशाताई घायाळ, गजेंद्र बोकन, सतिश माने, शशिकांत हांडे, दत्ता बोरोळे, बुथ प्रमुख धनंजय हाके, महेश बरगले, सिध्देश्वर सुलगुडले, आकाश बजाज, पवन स्वामी, शिवाजी कामले, राजेश पवार, शिवसेना शहर प्रमुख दिनेश बोरा, दिपक बडगिरे, चंद्रकांत शिंदे, संदीप मामा जाधव आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.
0 Comments