निलंगा : केंद्रातील सरकार व राज्यातील
महायुतीच्या सरकारने मागील काळात मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. हा विकास गावागावांत पोहोचला आहे. विकासाची हो गंगा अशीच अविरतपणे वाहती ठेवण्यासाठी महायुतीला साथ द्यावे, असे आवाहन माजीमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मंगळवारी मतदारसंघातील साकोळ, शेंद प., होनमाळ, चांभरगा, बोळेगाव, पांढरवाडी, शेंद उ., दैठणा, सुमठाणा, डिगोळ येथे आशिर्वाद यात्रे दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना केले.
मतदारांशी बोलताना आ. निलंगेकर म्हणाले, विरोधक महायुतीने काय केले? असे विचारत आहेत. विकास झाला नसल्याचा अपप्रचार ते करत आहेत. परंतु सत्ता असताना त्यांनी कोणती विकासकामे केली? हे विचारण्याची वेळ आता आलेली आहे. विकासाची परिभाषा या मंडळींना ठाऊक नाही. स्वतःचे कर्तृत्व नाही. लोकांसाठी तळमळ नाही. असे लोक केवळ अपप्रचाराचा आधार घेत आहेत. या निवडणुकीत विकासाची - गंगा आपल्या दारात आणणाऱ्यांना साथ द्यायची की अपप्रचार करणाऱ्यांच्या सोबत जायचे? याचा निर्णय आपणास करावयाचा आहे. प्रत्येक उंबरठ्याचा विकास हे ध्येय घेऊन महायुती सरकार काम करत आहे. त्यामुळेच समाजातील सर्व स्तरातील नागरिकांसाठी विविध योजना सरकारने राबविल्या. लाडकी बहीण, प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला
सरपंच-उपसरपंच भाजपात होनमाळ येथील सरपंच किशन हरणे,
उपसरपंच तिरुपती शिंदे यांच्यासह सर्वच ग्रामपंचायत सदस्यांनी आ. निलंगेकर यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला. असंख्य तरुणही भाजपवासी झाले. त्यांचे स्वागत करून सन्मानाची वागणूक देण्याचा शब्द आ. निलंगेकर यांनी दिला.
गॅस, एसटी प्रवासामध्ये ५० टक्के सवलतीत प्रवास आदी योजना सरकारने राबवल्या आहेत. याच पद्धतीने जनहिताची आणखी कामे करण्यासाठी आणि विकासाची गंगा अविरतपणे वाहती ठेवण्यासाठी महायुतीला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले. साकोळ येथून आशीर्वाद यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी आ. निलंगेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांकडून आशीर्वाद घेतले. लाडक्या बहिणींचे आशीर्वाद व तरुणांच्या शुभेच्छाही त्यांनी स्विकारल्या. यावेळी मंगेश पाटील, गोविंद चिलकुरे, अनिल शिंदे, सचिन भिक्का, नवनाथ डोंगरे, संतोष डोंगरे, महेश डुल्ले, ऋषिकेश बद्दे, भानुदास आवाळे यांची उपस्थिती होती. शेंद येथे मान्यवरांसह माधवराव बिरादार, बापू भिंगे, देविदास माने, अशोक पाटील, राजू मोरे, गणेश मोहिते, राजू जाधव, गणेश सलगरे, विशाल गायकवाड, पंकज रक्षाळे, विजय जागले यांनी यात्रेत सहभाग घेतला.
0 Comments