Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

लातूरकरांनी विनोद खटकेंना मतदान करून आशीर्वाद द्यावा...... रुस्तुम ए हिंद पैं सिकंदर शेख यांचे आवाहन

दिनांक:12/11/2024
लातूर : विनोद खटके यांच्या रुपाने
एक चांगला आणि जनसामान्यांची कामे करणारा तरुण वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उभा केला आहे. सर्वसामान्यांच्या मदतीला धाऊन येणारा आणि संकटकाळात मदतीचा हात देणाऱ्या विनोद खटके यांना लातूरच्या जनतेने मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन रुस्तुम-ए-हिंद तथा महाराष्ट्र केशरी पै. सिंकदर शेख यांनी
केले.
लातूर शहर विधासभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विनोद खटके यांच्या प्रचारार्थ ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी लातूरच्या लेबर कॉलनी येथील मदनी
चौकात आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते. नीक व्यासपीठावर वंचितचे उमेदवार विनोद खटके, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख, महंमद शफी, इलियास शेख, मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशी, शहराध्यक्ष सचिन गायकवाड, जिल्हा महासचिव संतोष सोमवंशी, हत्तीम शेख, अतुल गायकवाड, संजय सुरवसे, सुजित कांबळे, अजहर शेख, आमेर शेख, अजीम शेख, तौफिक कुरेशी, अवेज कुरेशी, रिजवान कुरेशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. सभेला हजारोच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments