Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

*डॉ. अर्चना पाटील यांच्या विजयासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा मान्यवरांशी सुसंवाद*

दिनांक:15/11/2024
 *लातूर( प्रतिनिधी ):  लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपा
महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चना पाटील यांच्या विजयासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी येथील भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात आयोजित संवाद मिळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी आ. अमित गोरखे, उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, अविनाश कोळी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रामदास भोसले, नंदू अग्रवाल, सीए संजय अग्रवाल, प्रदीप सोळंकी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पीयुष गोयल म्हणाले की, महाविकास आघाडी महाराष्ट्राला विनाशाकडे नेण्याचे काम करत आहे. ही महाविकास नव्हे तर महाविनाश आघाडी आहे. फेक नरेटिव्ह पसरवून अपप्रचार करण्याचे काम आघाडीकडून केले जात आहे. लातूर मतदारसंघात खोटी आश्वासने देत दिशाभूल करून, भाषणातून माथी भडकवण्याचे काम सुरू आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचे अंदाज विविध सर्वेक्षणातून व्यक्त झाले आहेत. लातूर मतदारसंघात महायुतीने एक उच्चशिक्षित व कर्तृत्ववान महिला उमेदवार दिला आहे. लातूरच्या विकासाचा आवाज बुलंद करण्यासाठी या उमेदवाराच्या पाठीशी रहा. त्यासाठी उर्वरित ६ दिवस महायुतीला द्या. मतदारसंघात ८० टक्के मतदान करून घेत अमित देशमुख व
धीरज देशमुख यांना पराभूत करून जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहनही पीयुष गोयल यांनी केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील
चाकूरकर यांनी लातूर हे मराठवाड्यातील एक मोठे व्यापार व उद्योग केंद्र आहे, असे सांगत रेल्वे कोच फॅक्टरी लातूरसाठी दिल्याबद्दल पीयुष गोयल यांचे आभार मानले. या प्रकल्पात अजून उत्पादन सुरू झाले नसून ते लवकर सुरू व्हावे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे २५० सहप्रकल्प लातूर एमआयडीसीत व्हावेत, अशी मागणी केली. यातून येथील तरुणांना उद्योग उभारता येतील. लातूरची अर्थव्यवस्था गतिमान होईल, असे ताई म्हणाल्या. लातूर मधून मोठ्या प्रमाणात जीएसटी व आयकर भरला जातो परंतु त्याच्याशी संबंधित कार्यालय नांदेड येथे आहे. ते लातूर येथे हलवावे. लातूर येथे मोठा उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत आदी मागण्याही त्यांनी केल्या. रामदास भोसले यांनी या मेळाव्याचे प्रास्ताविक केले. या मेळाव्यास जितेश चापसी, दिनेश गिल्डा, मुस्तफा शेख, विशाल अग्रवाल, भारत माळवदकर, फय्याज पटेल यांच्यासह शैलेश गोजमगुंडे, अॅड. दिग्विजय काथवटे व शहरातील उद्योजक, व्यापारी, सीए आणि विविध समाज घटकातील मान्यवर, महायुतीच्या पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments