Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

*आ. संभाजीराव पाटील दमदार नेता : गडकरी ताकीने त्यांच्या पाठीशी उभा आहेत, असे ना. नितीन गडकरी*



दिनांक:13/11/2024
देवणी : भाजपा महायुती उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ अभूतपूर्व गर्दी उसळली होती. उपस्थितीची संख्या लक्षात घेता संभाजीरावांच्या चौफेर विजयावर देवणीकरांनी शिक्कामोर्तबच केले आहे. संभाजीराव पाटील हा दमदार युवा नेता असल्याचे सांगत गडकरी यांनी निलंग्याच्या जनतेने त्यांच्या पाठीशी आपले मतदानरूपी पाठबळ उभे करण्याचे आवाहन या वेळी केले.
आपल्या भाषणात नितीन गडकरी म्हणाले की, आ. संभाजीराव पाटील निलंगेकर हे दमदार आमदार आहेत. ते कार्यसम्राट, मराठवाड्याचे दमदार नेते व महाराष्ट्रातील कार्यक्षम युवा नेते आहेत. त्यांची कार्यपद्धती उत्तम असून काम करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. म्हणून मी पूर्ण
ताकदीने त्यांच्या रागाशिव पाटील निलंगेकर हे स्वतःच्या साकारावर जिल्ह्याच्या व मतदारसंघाच्या समस्या सोडविणारे प्राकदीवर विचार आहेत. त्यांच्या पाठीशी राहत प्रचंड मतांनी निवदीन द्या, असे आवाहनही गडकरी यांनी केले. ग्रामीण क्षेत्र विकासामध्ये आ. संभाजीराव पाटील यांचे काम मोठे आहे. अक्कांनीही लोकसभेत प्रतिनिधित्व करताना विविध प्रश्न मांडून त्यांची सोडवणूक करून घेतली. लातूर शहरातील महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हलवण्यास विरोध असताना आ. संभाजीराव पाटील शिष्टमंडळ घेऊन माझ्याकडे आले होते. हा पुतळा न हलविण्याच्या सूचना आ. निलंगेकर यांच्यामुळेच आपण दिल्याचेही गडकरी म्हणाले. यावेळी बोलताना आ. निलंगेकर यांनी सांगितले
की, मतदारसंघाच्या विकासासाठी जे जे मागितले ते सर्व देण्याचे काम नितीन गडकरी यांनी केले आहे. दिल्लीत महाराष्ट्राच्या हक्काचा व विश्वासाचा माणूस अशी गडकरी यांची ओळख आहे. लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यात लक्ष घालावे अशी मागणी करत देवणी गोवंशाचे संवर्धन व्हावे तसेच हंचनाळ ते धनेगाव व राणी अंकुलगा येथील पुलांना मंजुरी देण्याची मागणी आ. निलंगेकर यांनी आपल्या भाषणात केली. निलंगा मतदारसंघात वारकरी संप्रदायाचे लोक राहतात.

Post a Comment

0 Comments