दिनांक:27/10/2024
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आ रमेशआप्पा कराड यांनी औसा येथे जाऊन सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर आणि हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे रविवारी आशीर्वाद घेतले.
गेली अनेक वर्ष सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अत्यंत कष्टातून मेहनतीतून लातूर ग्रामीण मतदार संघाची बांधणी करून गेल्या साडेतीन-चार वर्षात आमदारकीच्या माध्यमातून विविध विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन भाजपा पक्षाने पुन्हा एकदा आ रमेशआप्पा कराड यांना उमेदवारी दिली आहे. गुरुवर्य औसेकर महाराज यांचा आमदार कराड यांनी यथोचित सत्कार करून आशीर्वाद घेतले
. याप्रसंगी विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. गुरुवर्य महाराजांनी आशीर्वाद देऊन आप्पांना काही कानमंत्रही दिले. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत सोट, युवा मोर्चाचे सुरज शिंदे, प्रताप पाटील, लक्ष्मण नागिमे, ज्ञानेश्वर जुगल, डॉ उत्तरेश्वर हेरकर, पत्रकार रामेश्वर बद्दर, उद्योजक जगदीश कुलकर्णी, राम निडबणे यांच्यासह अनेक जण होते.
0 Comments