दि.28/10/2024
औसा (प्रतिनिधि): औसा मतदारसंघातील कासारशिरशी तालुका वावी अशी अनेकांची इच्छा होती त्यामुळे कासार शिरशी तालुका होणारच आहे राज्यात नवीन तालुका निर्मितीमुळे कासरशीशी बरोबर किल्लारीही मतदारसंघातील दोन तालुक्यांची निर्मिती होणार आहे. दोन्ही तालुक्यांची निर्मिती होताना त्या भागातील रावांना तालुक्यात तालुका निवडीची मुभा दिली जाईल विकासापासून वंचित असलेल्या 68 गावापासून विकासाची सुरुवात केल्याची प्रतिपादन आ. अभिमन्यू पवार यांनी केले 68 गावातील प्रचाराचा नारळ रविवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी देवी हल्लाळी येथे पडण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते मंचावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने व स्वराज कलशेट्टी,सुनील माने, सरपंच लक्ष्मण गिरी,कासार शिष्य मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, बालाजी पाटील, हभप दत्तात्रय बरमदे ,आवसा शिवसेनेचे तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे, नितीन पाटील, ओम बिरादार, शिवशरण पाटील मयूर गबुरे, विरेश चिंचनसुरे, मल्लिकार्जुन दानाई, वामन मुळे, सिद्धार्थ बिराजदार,कैलास पाटील, राहुल सूर्यवंशी, श्रीमंत मोरे,जिलानी बागवान ,महिला मंडळ अध्यक्ष कविता गोरे ,कल्पना ढविले, कल्पना गायकवाड, ज्योती कलशेट्टी आदी उपस्थित होते.
मी मागील पाच वर्षात जनतेची सेवा केली आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कायम तत्पर राहिलो आहे पाच वर्षात राज्यातील इतर आमदाराच्या तुलनेत औसाला अधिकचा निधी उपलब्ध झाला आहे.
0 Comments