औसा प्रतिनिधि: मागील पाच वर्षात आमदार अभिमन्यू पवार यांनी सर्वच घटकांची कामे केली असून त्यात युवकांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करून एमपीएससी मधील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत याचबरोबर शैक्षणिक चळवळीतील राजमाता जिजाऊ शाळा माझी न्यारी उपक्रम अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे धोरण आखून मतदारसंघातील शाळा अद्यावत करून सुविधा उपलब्ध केल्या तसेच तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून त्यांनी अडीचशे हेक्टरावर एमआयडीसी मंजूर केली त्यामुळे आवसा मतदार संघाच्या उज्वल भविष्यासाठी तरुणांनी पाठीशी खंबीर राहून साथ द्यावी असे आव्हान भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता यांनी केले आहे.
औसा विधानसभा मतदारसंघ भाजप शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रयत क्रांती संघटना व मित्र पक्षांच्या वतीने पदभार पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा दिनांक 22 ऑक्टोबर रोजी आवसा येथे निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ती बोलत होते पुढे बोलताना संतोष मुक्ताई यांनी म्हणाले मतदारसंघात आपण विकासाचा मुद्द्यावर जनतेला मत घेणार आहोत . येणाऱ्या काळात मतदार संघातील उद्योग व रोजगार निर्मितीसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगून आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेल्या विविध विकास कामाची माहिती त्यांनी दिली यावेळी औसा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments