Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

वाहनासह 11 लाख 93 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. 04 व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल. पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण ची कारवाई.* या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक अमोल

दिनांक;01/07/2025

              उदगीर (प्रतिनिधी):पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे,यांचे मार्गदर्शनात संपूर्ण लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर कठोर कारवाईची मोहीमसुरू करण्यात आली आहे.


           दिनांक 30/06/2025 रोजी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणच्या पोलीस पथकास महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी शिरोळ जानापूर गावाच्या शिवारातून वाहतूक होणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाली. सदर माहितीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांचे मार्गदर्शनात सदरचे पथक दिनांक 30/06/2025 रोजी  रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शिरोळ जानापूर जाणारे रोडवर दुर्गा देवी तांडा  शिवारात रोडवर सापळा लावून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला 04 लाख 93 हजार 860 रुपयांचा गुटखा व एक  एक पांढ-या रंगाची इटॉस कंपनीची कार एम.एच.24 ए यु 3577 असा एकूण 11 लाख 93 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

               प्रतिबंधित गुटका, सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आलेला इसम नामे


1) गोपाळ बंडू केसाळे, वय 28 रा वंजारवाडा जळकोट(अटक)


 2) विनायक महादेव गौड रा. जाब ता. मुखेड ,(फरार)


3) नागेष अंभाजी दुरनाळे,जाब ता. मुखेड (फरार) 


4) माधव मोरे रा. जाब ता. मुखेड (फरार)


              यांचे विरुद्ध पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

               सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात, उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पूजारी यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार राम बनसोडे , राहुल नागरगोजे, संतोष शिंदे, नामदेव चेवले, राजकुमार  डबेटवार,सचिन नाडागूडे यांनी केली.

Post a Comment

0 Comments