दिनांक: 14/05/2025
शिरूर ताजबंद::आज दिनांक 14/05/2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व ग्रामपंचायत च्या वतीने सुरज भैय्या पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत मार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तक वाटप करण्यात आले व तसेच पुस्तके व वृक्षारोपण करण्यात आले स्वच्छता कर्मचारी महिलांना साडी चोळी वाटप करून त्यांना गौरविण्यात आले.
आज रोजी प्रमुख पाहुणे म्हणून शिरूर ताजबंद चे सरपंच मच्छिंद्र वाघमारे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत घुगे युवराज भैय्यासाहेब पाटील, रणवीर पाटील, दीपक वाघमारे, किनिवाले व ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments