दिनांक:23/05/2025
लातूर (प्रतिनिधी) लातूर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने लातूर शहरातील सूतमिल परिसरात कारवाई करत 81 हजार 800 रुपये किमतीचा 16.36 ग्रॅम मेफेड्रोन म्हणजेच एमडी ड्रग्स जप्त.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात लातूर पोलिसांकडून अवैध धंद्यावर मोठ्या प्रमाणात छापेमारी करून गुन्हे दाखल करण्यात येत असून त्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकाने दिनांक 22/05/2025 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुतमील परिसरातील एका महिलाच्या घराच्या बाजुस व घरामध्ये इसम नामे
1) ऋषीकेश शेषराव राठोड, वय २८ वर्षे रा. नाथनगर, पवन कॉलनी लातूर.
2) संयम बालाजी पडीले, वय 26 वर्ष रा. बिदर रोड. उदगीर जि. लातूर
3) 35 वर्षीय महिला रा. सुतमील रोड. लातूर.
4) अनुप नवनाथ सोनवणे रा. निगडी, पुणे हा.मु. सुतमील रोड, लातूर (फरार)
एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स यांनी अवैध विक्री करणेसाठी अनुप नवनाथ सोनवणे याची पत्नीने अवैध विक्री करणेसाठी स्वतःच्या घरामध्ये बाळगलेले अंमली पदार्थ दोन पिशवीसह एकूण 16.36 ग्रॅम वजनाचा 81,800 रू. किमतीचा अंमली पदार्थ एमडी, गुन्हयात वापरलेले वेगवेगळ्या कंपनीचे 04 मोबाईल, एमडी ड्रग्स वजन करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वजन काटा असा एकूण 02 लाख 82 हजार 300 रुपयांचा अमली पदार्थ एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज हस्तगत करण्यात आला आहे.
एमडी ड्रग्सची विक्री करताना मिळून आलेले एक महिला व तीन पुरुष अशा चार जणा विरुद्ध पोलीस ठाणे शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे तर फरार आरोपी अनुप सोनवणे याचा शोध सुरू आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाणे आमचे पोलीस अधिक तपास करीत आहेत. करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार युवराज गिरी, अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मोहन सुरवसे, नाना भोंग, सचिन दरेकर, मनोज खोसे, गोविंद भोसले, राहुल कांबळे, नितीन कठारे, चंद्रकांत डांगे, बंडू नीटुरे, प्रदीप चोपणे यांनी केली आहे.
0 Comments