Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

*1 मे महाराष्ट्र दिन निमीत्त गुन्हयातील चोरी गेलेला 49,26,093/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मा.पालक मंत्री यांच्या हस्ते फिर्यादीना साभार परत...*

दिनांक:02/05/2025

लातूर (प्रतिनिधी) 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयातील डी पी डी सी हॉलमध्ये पार पडलेल्या छोटेखाणी कार्यक्रमात लातूर जिल्हयातील मागील एका महिन्यात चोरीच्या गुन्हयातील गुन्हेगाराकडुन हस्तगत केलेला किंमती मुद्देमाल व नागरीकांची ऑनलाईन फसवणुक झालेली रक्कम रोजी मा.ना.श्री. शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसलेमंत्री, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर जिल्हा यांचे हस्ते नागरीकांना साभार परत  देण्यात आले.


 यामध्ये चोरी, घरफोडी अशा 07 गुन्हयातील किंमती मुद्देमाल सोने, चांदी व रोख एकुण किं. 9,41,065/- वाहन चोरी 03 गुन्हयातील मोटार सायकल व ट्रॅक्टर असा मुद्देमाल एकुण किंमत 2,72,000/- मोबाईल चोरीचे 33 मोबाईल फोन एकूण किंमत. 4,08,499/- ऑनलाईन फसवणुक झालेली 16 गुन्हयातील रोख रक्कम एकुण 33,04,529/-


असा एकुण 09 पोलीस स्टेशन अंतर्गत 59 गुन्हयातील किंमती मुदेमाल, वाहने, मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल फिर्यादीस परत देण्यात आला. एकुण 49,26,093/- हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल फिर्यादीस परत देण्यात आले आहे.

              तसेच माहे फेब्रुवारी 2025 मध्ये मा.पोलीस उपमहानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांचे वार्षीक तपासणी दरम्यान लातूर जिल्हयातील एकुण 64 गुन्हयातील एकुण 68,15,021/- रुपये किमतीचा मुद्देमाल (सोने, चांदी, मो.सा, मोबाईल फोन, रोख) मा. पोलीस उपमहानिरीक्षक, नांदेड - परिक्षेत्र नांदेड यांचे हस्ते नागरीकास/तक्रारदारास परत देण्यात आला आहे.

          लातूर जिल्हयात सन 2025 मध्ये वर नमुद प्रमाणे एकुण 123 गुन्हयातील एकुण 1,17,41,114/- किंमतीचा मुद्देमाल गुन्हेगाराकडुन हस्तगत करण्यात लातूर पोलीस दलास मोठे यश आले आहे. तसेच सदरचा चोरीचे गुन्हयातील मुद्देमाल नागरीकास / तक्रारदारास तात्काळ परत करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments