लोकसभा-2024 निवडणुकी प्रमाणे ही विधानसभा निवडणुकही शांततेत पार पाडण्यासाठी लातूर जील्हावासियांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले आहे.
विधानसाभा निवडणूक- 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि प्रभारी पोलीस ठाणे अधिकारी यांना निवडणुक शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी दक्षता घेण्याबाबतच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार आणि होमगार्ड यांना निवडणुकिबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. निवडणुक कार्यक्रम जाहीर झालेनंतर संपूर्ण जिल्हयात अवैध्यरीत्या दारुची आणि इतर अंमली पदार्थाची वाहतुक होवु नये म्हणुन चेकपोस्ट कार्यान्वीत करण्यात आलेले आहेत. राज्याच्या सीमेवर 06 आणि 18 आंतरजिल्हा चेकपोस्ट असे एकूण 24 चेकपोस्ट कार्यान्वीत करण्यात आलेले आलेला आहे.
निवडणुकिच्या बंदोबस्तकरीता जिल्हयातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांचे सोबतच सीआरपीएफ, बीएसएफ च्या एकुण 03 कंपनी लातूर जिल्हयामध्ये हजर झालेल्या आहेत. या कंपन्या तसेच स्थानिक पोलीस, होमगार्ड यांचे रुट मार्च चे नियोजन करण्यात आलेले आहे.
11 लाख 50 हजार रुपयांची देशी विदेशी दारू, हातभट्टी, जप्त करून 315 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर गुटखा अनुषंगाने 09 केसेस करून 18 लाख रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे. तसेच जुगार अंतर्गत 29 गुन्हे दाखल करून 13 लाख 22 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सर्व प्रभारी अधिकारी यांना जास्तीत जास्त अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या असुन एकंदरीत स्थानिक गुन्हे शाखा, निगराणी पथक, विशेष पथके व पोलीस ठाणे स्तरावर अवैधरित्या दारुची, गुटख्याची तसेच अमली पदार्थाची वाहतुक व विक्री करणा-यावर कारवाई करुन जवळपास 33,00,000 /-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तसेच चेकपोस्टवर केलेल्या वाहन तपासणी मध्ये रोख रक्कमही जप्त करण्यात आलेली आहे.
अवैधरित्या दारुची, प्रतिबंधित गुटखा व नशाकारक द्रव्य पदार्थांची वाहतुक, साठवणूक करणा-या तसेच विक्री करणा-यावर कारवाई करण्यात येत असुन नमुद मुद्देमाल कोठुन आणला आणि कोणासाठी आणला हे सखोल तपास करुन आरोपी निष्पन्न करण्यात येत आहे.
यापुर्वी लोकसभा निवडणुक -2024 मध्ये आचारसंहिता कालावधीत अवैध धंदे करणा-यावर कारवाई करण्यात आली होती अशा अवैध धंदे करणारे आरोपी निष्पन्न करुन त्यांचेवर कारवाई करण्यात येत आहे आणि संबंधित इसमांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवणेसाठी संबंधित पोलीस अधिकारी यांना कळविण्यात आलेले आहे.
जिल्हयामध्ये मोहीम राबवून पाहिजे असणारे असे एकूण आरोपी 11 फरारी/पाहिजे आरोपीचा शोध घेवुन अटक करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगारी पार्श्वभुमी असणारे आणि निवडणुक कालावधीत त्रासदायक ठरणा-या एकूण 1361 लोकांवर प्रचलित
कायाद्याप्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सीमालगत राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाणे स्तरावर बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
जिल्हयातील सर्व पोलीस पाटील, शांतता कमिटीचे सदस्य यांच्या बैठका घेण्यात आलेल्या असुन नमुद बैठकिमध्ये विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडण्याबाबतच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.
अशाप्रकारे जिल्हयातील विधानसभा निवडणुक शांततेत पार पडावी म्हणुन लातूर पोलीसदल सज्ज असुन सर्व नागरिकांनी जिल्हयामध्ये शांतता ठेवुन सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले आहे.
0 Comments