Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

*स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे - विरोधी पक्षनेते अंबादास दानवे*

दिनांक:25/05/2025

लातूर (प्रतिनिधी) महाराष्ट्रात होणाऱ्या संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेव ठाकरे या पक्षाचा भगवा फडकवण्यासाठी जिल्ह्यातील तमाम शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी कामाला लागावे असा संदेश महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लातूर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलताना दिला आहे. 


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार महाराष्ट्रामध्ये येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यावा असा आदेश आल्याने सर्वच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मोर्चे बांधणीसाठी सज्ज झाले आहेत आपल्याच पक्षाचा झेंडा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहात फडकावा यासाठी संघटन बांधणीकडे लक्ष दिले जात असताना शिवसेना नेते तथा विधान परिषदेची विरोधी पक्षनेते अंबादारा दानवे यांनी लातूर जिल्हा शिवसेनेची बैठक बोलावली होती या या बैठकीमध्ये लातूर शहर महानगरपालिकेसह, नगरपालिका नगर पंचायत व लातूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निवडणुका लढवाव्यात जास्तीत जास्त जागा लढवून शिवसेना संघटन बांधणी करून शिवसेनेचा भगवा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहात फडकवावा यासाठी सर्वच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावांमध्ये वार्डात प्रभागात तसेच जिल्हा परिषद गट गन पिंजून काढून बूथ रचनेपासून ते प्रभाग रचना उमेदवार निवडी पर्यंत लक्ष द्यावे आज पासूनच प्रबल अशी संघटना बांधणी करून शिवसेनेचा उमेदवार सभागृहात कसा पोहोचेल यासाठी सर्व जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख शहर प्रमुख, विभाग प्रमुख, गटप्रमुख, शाखाप्रमुख आदींनी आपापल्या भागामध्ये जाऊन स्थानिक पातळीवर बैठका घेऊन तेथील समस्या सोडवण्यासाठी होणारे प्रयत्न यावर लक्ष द्यावे जनतेच्या जोपर्यंत तुम्ही समस्या सोडवणार नाही तोपर्यंत जनता तुमच्या सोबत येणार नाही यामुळे जनतेच्या समस्यांना प्राधान्य द्यावे अशासूचना यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेना बैठकीमध्ये बोलताना सांगितले त्यावेळी बैठकीसाठी लातूर जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख नामदेव चाळक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी महिला जिल्हा संघटक सौ जयश्रीताई उटगे, महानगर प्रमुख सुनील बसपुरे, उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव, हरिभाऊ सगरे, डॉ. शोभाताई बेजगें, विष्णू साठे, युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी दिनेश जावळे, तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, भागवत वंगे, मुकेश सुडे, कैलास पाटील, परमेश्वर सुर्यवंशी, शिवाजी चव्हाण, शेतकरी सेनेचे अण्णासाहेब मिरगाळे, प्रकाश हैबतपुरे, किसन समुद्रे, बसवराज मंगरूळे, अनिल स्वामी, राहुल रोडे यासह जिल्ह्यातील तमाम शिवसेना पदाधिकारी शेकडो शिवसैनिक तालुका प्रमुख उप तालुका प्रमुख शहर प्रमुख विधानसभा संघटक युवा सेना महिला आघाडी व संलग्न शाखेचे पदाधिकारी तसेच शाखाप्रमुख विभाग प्रमुख बुथ प्रमुख यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments