Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

शास्त्रोक्त पध्दतीने तपास करत 12 तासाचे आत चोरी करीत असताना केलेल्या दुहेरी खुनातील आरोपी अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी.*

दिनांक:28/05/2025

रेणापूर (प्रतिनिधी): दिनांक 25 मे ते 26 मे च्या मध्यरात्री पोलीस ठाणे रेणापूर हद्दीतील मौजे गरसोळी गावातील शेतामध्ये राहत असलेल्या घरातील वयोवृद्ध दांपत्याच्या चोरी करीत असताना विरोध केल्याने वयोवृद्ध कातळे दांपत्याचा खून करून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली होती. यामध्ये वयोवृद्ध महिलेच्या अंगावरील सोने चोरून त्याच्या डोक्यात कुकर ने, दगड व विटाने मारून तसेच त्याचे अपंग पतीस उचलून घेऊन जाऊन बाजूच्या विहिरीत टाकून खून केल्याचे दिनांक 27/05/2025 रोजी समोर आले होते. त्यावरून दिनांक 27/05/2025 रोजी पोलीस ठाणे रेनापुर येथे गुरन 187/2025 कलम 103(1) 309(4), 331(3)(4) भारतीय न्याय संहीता प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे निर्देशावरून अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे हे घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकाला सखोल मार्गदर्शन व सुचना करुन तात्काळ रवाना करण्यात आले होते. पथकाने गोपनीय बातमीदार नेमून शास्त्रोक्त पध्दतीने तपासाला सुरुवात केली. 


              पोलीस अधिक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधिक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात पथकाने गोपनीय बातमीदारा कडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून आटोकाट प्रयत्न करत वयोवृद्ध कातळे दांपत्याच्या मारेकरऱ्याचा शोध घेतला.

             वरीष्ठांचे मार्गदर्शनात सदर पथकांने गोपनीय व शास्त्रोक्त माहितीच्या आधारावर नमुद गुन्ह्यातील व गरसोळी गावातच राहणारा इसम


1) पंडित कोंडीबा रावणकुळे, वय 32 वर्ष, राहणार गरसुळी तालुका रेनापुर जिल्हा लातूर.


             यास त्यांचे राहते ठिकाणाहून दिनांक 27/05/2025 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल झाल्याच्या 12 तासाचे आत आरोपी निष्पन्न करून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने चोरी करण्याच्या उद्देशाने तसेच वयोवृद्ध महिला नेहमी संशयित आरोपीला,"तू चोर आहेस" असे म्हणत असल्याचा राग मनात धरून वयोवृद्ध कातळे दांपत्याचा खून  करुन महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरल्याचे कबुल केले आहे. नमूद आरोपी विरुद्ध यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.  गुन्हयाचा पुढील तपास रेनापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निकम हे करीत आहेत.


              सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अपर  पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे तुराब पठाण, राजेश कंचे, संजय कांबळे, नकुल पाटील, सायबर सेलचे संतोष देवडे, गणेश साठे,यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments